॥ ॐ केशवाय नमः ॥ चेन्न म्हणजे कानडी भाषेत सुंदर आणि केशवा म्हणजे विष्णू, आणि सुंदर अश्या विष्णूचे मंदिर तेच चेन्नकेशवा मंदिर. कर्नाटक राज्यातल्या हासन जिल्ह्यात बेलूर या गावात हे भव्य दिव्य मंदिर आहे. भव्यतेची कल्पना मंदिर बांधायला १०३ वर्षे लागली यावरूनच घ्यावी. तेराव्या शतकात होयसळ साम्राज्यात हे मंदिर बांधले गेलं. मंदिराचा आवार अतिप्रचंड असून आत मध्ये साक्षात श्री विष्णूंची पूजा घडत असल्यामुळे आध्यात्मिक स्पंदनं सक्रिय आहेत. चित्र क्र १ मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार मंदिराचे मुख्य भाग १) गोपूर २) गरुड मूर्ती आणि गरुड ध्वज ३) मुख्य मंदिर ४) मुख्य मंदिराची लहान प्रतिकृती ५) झोपाळा - विशिष्ट दिवशी देवाला झोपाळ्यात बसवून झोके देतात , ६) कल्याण मंडप - गावातल्या लोकांसाठी लग्ना साठी सभागृह. ७) देवीचं देऊळ. ८) बारव - देवळासाठी पाण्याची व्यवस्था, लहान विहीर. ९) कृष्ण मंदिर. १०) मंदिराभोवतीचं दगडी कुंपण ( विविध नागदेवता आणि इतर देवतांची शिल्पं आणि सोबतच अनेक वीरगळ. ) आता मंदिराच्या वेगवेगळ्या भागांची महत्वाची माहिती घेऊया. चित्र क्र २ गोपूर मंदिरा समोरच अतिशय भव्य गोपूर दिमाखात...
कलासक्त , ब्राम्ही लिपी, शिलालेख, मूर्ती शास्त्र , लेणी , किल्ले , मंदिर , बारव - प्राचीन जलव्यवस्थापन अभ्यासक