मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Herostone लेबलसह पोस्ट दाखवत आहे

त्रिंगलवाडी गावातील घोडेस्वार सतीशिळा

॥ हर हर महादेव ॥ वीरगळांचे अनेक प्रकार आढळतात. त्यातला सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे सतीशिळा. वीरगळ हा वीराच्या मृत्युचे कारण दर्शवतो तर सतीशिळा ही त्या वीराची पत्नी त्याच्या मृत्युनंतर  सती गेली हे दर्शवते. सतीशिळा ओळखावी कशी हे समजण्यासाठी वीरगळाचे नीर निरीक्षण करावे. त्याच वीरगळावर जर कुठेही कोपरापासून दुमडलेला हात दिसला ( चित्र क्र १ ) तर त्या वीरगळाला सतीशिळा म्हणतात. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या ( ईगतपूरी, नाशिक ) पायथ्याशी प्राचीन जैन लेणी आहेत. त्यांच्या जवळ आढळलेल्या सतीशिळेबद्दल. चित्र क्र १. सतीशिळेचं छायाचित्र. चित्र क्र. २. सतीशिळेचं संपादीत छायाचित्र.   चित्र क्र ३. सतीशिळेचा खालचा टप्पा   चित्र क्र. ४. सतीशिळेचा मधला कप्पा नेहमी प्रमाणे वीरगळ आणि सतीशिळा टप्प्या टप्याने समजून घेऊ. कप्पा क्र १ . सर्वात खालचा कप्पा . चित्र क्र ( ३ ) सर्वात खालच्या कप्प्यात सती जाणारी स्त्री घोड्यावर बसलेली दिसते . सोबत तिच्या सहचरणी आहेत . त्यांच्या डोक्यावर सतीचे वाण आहे.  कप्पा क्र. २ वीरगळाच्या  उजव्या बाजूला कोपरातून दुमडलेल...

सोलापूरजवळील सकाट गावातील वीर स्त्रीचा वीरगळ .

 ॥ हर हर महादेव ॥ चूल आणि मूल इतकीच चाकोरीबद्ध भूमिका स्रियांनी निभावली हे आपल्याला इतिहासकारांनी मनावर अगदी सहजपणे ठसवलं. पण भारतीय इतिहास केवळ पुस्तकांमधून नाही तर शिलालेख, बारव, मंदिरं आणि वीरगळ अशा अनेकोत्तम साधनांमधून वाचता येतो. आपल्याकडे लागते ती केवळ दृष्टी !  मागे सोलापूरच्या सहलीमध्ये सकाट गावात एक वीरगळ माझ्या दृष्टीस पडला. मारुतीच्या मंदिरात मारुतीच्या मूर्तीशेजारीच असे दोन वीरगळ पहायला मिळतात. ही गोष्ट मला सर्वत्र आढळली की वीरगळांचा संदर्भ काहीकदा लागत नसल्याने ते गावाच्या वेशीवर, देवळांमध्ये किंवा किल्ल्यांवर कुठेतरी कडेला लावून ठेवलेले दिसतात. चित्र क्र १ . वीरगळाचे छायाचित्र . चित्र क्र २. वीरगळाचे संपादित केलेलं छायाचित्र . वीरगळ म्हणजे एक शिल्पपटच असतो. आणि म्हणून त्याला टप्प्या टप्प्यानेच समजून घ्यावं लागतं. टप्पा क्र १. खालून पहिला कप्पा. नेहमीप्रमाणे वीरगळाचा खालचा कप्पा हा वीराच्या मृत्यूचं कारण दर्शवतो. इथे पुरुषांऐवजी दोन स्त्रिया ( पिवळा रंग ) हातात ढाल आणि तलवार घेऊन लढताना दिसतात. गुडघ्यापर्यंत आलेली वस्त्रं, केसांचा बांधलेला अंबाडा, काना...

वीरगळ - गोधन संरक्षक ( भंडारदरा रतनवाडी )

गोधन संरक्षणाचा वीरगळ - अमृतेश्वर मंदिराजवळ , रतनवाडी, भंडारदरा ॥ हर हर महादेव ॥ यांत्रिकीकरण आणि औद्योगिकरणाच्या आधीच्या युगात पशुधन हे पण माणसाची मालमत्ता समजली जाई . ब्रिटीश काळात आणि थोडं त्यापूर्वीच्या काळात ओसरीवर झोपाळा , स्वतःची विहीर आणि गुराढोरांचा पसारा असणारा माणूसही श्रीमंत समजला जाई . शेतीसाठी पशूपालनाची गरज आणि त्या निमित्ताने का होईना पशू पक्ष्यांशी माणसांचा जिव्हाळा होता . वैदिक काळात तर गायींचा वापर चलन म्हणून केला जाई . मग कालांतराने विकत घेतलेल्या वस्तूच्या मोबदल्यात अर्धी गाय किंवा पाव गाय देणे शक्य नसल्याने इतर वस्तूंची देवाणघेवाण सुरु झालं . याची अखेर चलन व्यवस्थेत झाली तरी पशुधन, गोधन हे शब्द आजही व्यवहारात आहेत . ( संदर्भ : - प्राचीन भारतीय नाणकशास्त्र , एम. के . ढवळीकर ) .   ह्या पशुधनावर अनेकदा हल्ले होत असत . कधी श्वापदं ( वाघ , सिंह , कोल्हा इत्यादी ) , तर कधी टोळीयुद्ध, तर कधी चोर दरोडेखोर, इतर राज्यातले सैनिक इत्यादी पशुधनावर हल्ला करत असत . अशा वेळेला स्वतःचं पशुधन वाचवायला लोक प्राणांची बाजी लावायला ही कमी करत नसत . आणि जर या प्रसंगात ते मृत्यू...

विरगळ - Hero stone नौकादलाचा वीरगळ ( महाराष्ट्रातील एकमेव ) एकसार ( बोरिवली , मुंबई )

                      ॥ श्री गणेशाय नमः ॥ हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसि महिम् । तस्मादुतिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय ॥  भगवदगीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या ३६ व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करताना म्हणतात की " हे अर्जुना ! युद्धासाठी तयार हो कारण युद्धात मरण पावला तर तुला स्वर्गप्राप्ती होईल आणि जर का तुझा विजय झाला तर पृथ्वीचे राज्य उपभोगायला मिळेल त्यामुळे युद्धाचा निश्चय कर आणि तयार हो. " आपल्या शास्त्रानुसार फार पूर्वीपासून युद्धांमध्ये वीरमरणाची प्राप्ती व्हावी याला अपार महत्व दिले गेलंय. आणि अशा या वीरांचे स्मरण येणाऱ्या पिढीला कायमस्वरूपी होत राहावं म्हणून जो शिल्प विशेष उदयाला आला तो म्हणजे विरगळ (Herostone )! वीरगळ समजून घेण्यासाठी त्याच्या मुळ संरचनेला समजून घ्यावं लागतं. काळ आणि स्थानपरत्वे त्याच्या रचनेत थोडं भिन्नत्व आहे परंतु वीर मरण आलेल्याचं स्वर्गरोहण आणि स्वर्गप्राप्ती या मूलभूत गोष्टी प्रत्येक शिल्पात आढळून येतात .  वीरगळ बनवण्याची संकल्पना ही साधारणतः सातवाहन क...