॥ श्री गणेशाय नमः ॥ वसई विरार हा पूर्वीपासूनच हरित पट्टा म्हणून ओळखला जातो . सोनचाफा , तगर आणि इतर फुलशेती, केळी आणि नारळीच्या बागा, आणि इतर भाजीपाला ह्या पट्टयात अगदी विपुल प्रमाणात पिकतो . पूर्वेला जिवदानीचा आणि बारोंडा देवीचा डोंगर, पश्चिमेला पंचवीसेक किलोमीटरचा समुद्र किनारा, उत्तरेला वैतरणेची खाडी आणि दक्षिणेला उल्हासची (वसईची) खाडी अशा भौगोलिक रचनेत वसलेला हा प्रदेश ! समुद्र आणि खाड्यांमधलं खारट पाणी सिंचनासाठी वापराला सोयीस्कर नव्हतं . पावसाचं पडलेलं पाणी समुद्र जवळ असल्यामुळे अगदी सहज समुद्रात वाहून जात असे . आणि म्हणूनच सिंचनासाठी बावखळांची निर्मिती झाली . बावखळ बाव म्हणजे विहीर आणि खळ म्हणजे खडडा ! म्हणजेच पाणी साठवण्यासाठी विहीरी सारखा गोल खोलाकार खड्डा म्हणजे बावखळ .पण मग त्याला विहीरच का नाही म्हणत हे समजण्यासाठी आपल्याला बावखळांची रचना नीट समजून घ्यावी लागेल . चित्र क्र. १ . बावखळांची रचना आणि वैशिष्ट्ये . चित्र क्रमांक एक मध्ये दाखवल्याप्रमाणे तळाशी बेसॉल्ट खडक सापडतो .बेसॉल्ट खडक हा भुजलधारक आहे . भुसभुशीत कडा ह्या नैसर्गिक उतार...
कलासक्त , ब्राम्ही लिपी, शिलालेख, मूर्ती शास्त्र , लेणी , किल्ले , मंदिर , बारव - प्राचीन जलव्यवस्थापन अभ्यासक