मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मूर्तीशास्त्र लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गणरायाचं खरं रूप: शास्त्र, संस्कृती आणि पर्यावरणपूरक मूर्ती !

 ||  श्री गणेशाय नम:  || " अरे राहुल ! गणपतीचे डोळे कधीही सरळ एका रेषेत आणि आडवे नसतात. गणपती हे गजवक्त्र म्हणजे हत्तीचे तोंड/मुख असलेली देवता आहे. आणि हत्तीचे डोळे तिरके असतात. तुम्ही मुंबईकरांनी स्वतःला वाट्टेल तसा गणपती घडवलात. त्याला उगाचच मानवी स्वरूप दिलंत. माणसासारखे सरळ आणि आडवे डोळे असल्यामुळे तो गणपती माणसासारखा दिसतो आणि त्यामुळे कदाचित तो तुम्हाला लोभस वाटतो. पण हि प्रथा बरी नव्हे. " इति नंदा आजोबा.  कैक वर्षांपूर्वी मी आमच्या मूळ गावी ( मिरज ) गेलो होतो. मी सुध्दा कैक वर्ष विरारच्या  गणपतीच्या कारखान्यात काम शिकत होतो. सहज म्हणून गावच्या कारखान्यात एक चक्कर मारली. सर्व गणपती थोडे वेगळे दिसले. आमच्या मुंबईत नाही असं बनत, तुमच्याकडचे साचे थोडे वेगळे आहेत. त्यावर नंदा आजोबांनी मला हे उत्तर दिलं. मुळातच तेव्हा माझी गणपती आणि मूर्ती शास्त्राबद्दलची जाण तशी बेताचीच असल्यामुळे तो विषय मग अलगद मागे पडला. पण कालांतराने मी ह्या मूर्तिशास्त्राचाअभ्यास सुरु केल्यावर मला आजोबा काय म्हणत होते ते स्पष्टपणे उलगडू लागले. अजून खोल खोल शोध घ्यायला सुरु केला तेव्ह...

चेन्नकेशवा मंदिर, बेलूर, कर्नाटक, भाग १

॥ ॐ केशवाय नमः ॥ चेन्न म्हणजे कानडी भाषेत सुंदर आणि केशवा म्हणजे विष्णू,  आणि सुंदर अश्या विष्णूचे मंदिर तेच चेन्नकेशवा मंदिर. कर्नाटक राज्यातल्या हासन जिल्ह्यात बेलूर या गावात हे भव्य दिव्य मंदिर आहे. भव्यतेची कल्पना मंदिर बांधायला १०३ वर्षे लागली यावरूनच घ्यावी. तेराव्या शतकात होयसळ  साम्राज्यात हे मंदिर बांधले गेलं. मंदिराचा आवार अतिप्रचंड असून आत मध्ये साक्षात श्री विष्णूंची पूजा घडत असल्यामुळे आध्यात्मिक स्पंदनं सक्रिय आहेत.  चित्र क्र १ मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार मंदिराचे मुख्य भाग १) गोपूर २) गरुड मूर्ती आणि गरुड ध्वज ३) मुख्य मंदिर ४) मुख्य मंदिराची लहान प्रतिकृती ५) झोपाळा - विशिष्ट दिवशी देवाला झोपाळ्यात बसवून झोके देतात , ६) कल्याण मंडप - गावातल्या लोकांसाठी लग्ना साठी सभागृह. ७) देवीचं देऊळ. ८) बारव - देवळासाठी पाण्याची व्यवस्था, लहान विहीर. ९) कृष्ण मंदिर. १०) मंदिराभोवतीचं दगडी कुंपण ( विविध नागदेवता आणि इतर देवतांची शिल्पं आणि सोबतच अनेक वीरगळ. ) आता मंदिराच्या वेगवेगळ्या भागांची महत्वाची माहिती घेऊया. चित्र क्र २ गोपूर मंदिरा समोरच अतिशय भव्य गोपूर दिमाखात...

त्रिंगलवाडी गावातील घोडेस्वार सतीशिळा

॥ हर हर महादेव ॥ वीरगळांचे अनेक प्रकार आढळतात. त्यातला सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे सतीशिळा. वीरगळ हा वीराच्या मृत्युचे कारण दर्शवतो तर सतीशिळा ही त्या वीराची पत्नी त्याच्या मृत्युनंतर  सती गेली हे दर्शवते. सतीशिळा ओळखावी कशी हे समजण्यासाठी वीरगळाचे नीर निरीक्षण करावे. त्याच वीरगळावर जर कुठेही कोपरापासून दुमडलेला हात दिसला ( चित्र क्र १ ) तर त्या वीरगळाला सतीशिळा म्हणतात. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या ( ईगतपूरी, नाशिक ) पायथ्याशी प्राचीन जैन लेणी आहेत. त्यांच्या जवळ आढळलेल्या सतीशिळेबद्दल. चित्र क्र १. सतीशिळेचं छायाचित्र. चित्र क्र. २. सतीशिळेचं संपादीत छायाचित्र.   चित्र क्र ३. सतीशिळेचा खालचा टप्पा   चित्र क्र. ४. सतीशिळेचा मधला कप्पा नेहमी प्रमाणे वीरगळ आणि सतीशिळा टप्प्या टप्याने समजून घेऊ. कप्पा क्र १ . सर्वात खालचा कप्पा . चित्र क्र ( ३ ) सर्वात खालच्या कप्प्यात सती जाणारी स्त्री घोड्यावर बसलेली दिसते . सोबत तिच्या सहचरणी आहेत . त्यांच्या डोक्यावर सतीचे वाण आहे.  कप्पा क्र. २ वीरगळाच्या  उजव्या बाजूला कोपरातून दुमडलेल...

शिलालेखांचं नंदनवन - समुद्राकाठची कुडा लेणी, मुरुड !

॥ श्री गणेशाय नमः ॥ एखाद्या लेण्यामध्ये शांतचित्ताने डोळे मिटून ध्यान करावं आणि डोळे उघडल्यावर साक्षात समुद्र देवाचे दर्शन व्हावं असा अनुभव देणारं एकमेव लेणं हे कोकणात मुरुड मध्ये मांदाड गावाजवळ कोरलेलं आहे. नेहमीप्रमाणे एखाद दुसरे लेणं नसून इथेही २६ लेण्यांचा समूह दिसतो. कोकणाची ओळख असलेल्या जांभा खडकांमध्ये ही लेणी नाहीत हेही त्याचं एक वैशिष्ट्य ! लेणी बेसॉल्ट खडकात कोरलेली असून त्यात बुद्ध, समुद्री घोडा आणि दान देणाऱ्या युगुलाचं शिल्प इत्यादी अनेक शिल्प आढळतात. सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे प्रत्येक लेण्यांच्या दारावर आढळणारे शिलालेख आणि त्यांना कोरताना कोरक्याने वापरलेली प्रतिभा संपन्न वळणं. जुन्नर, नाशिक इत्यादी ठिकाणी आढळणाऱ्या शिलालेखांपेक्षा या शिलालेखांमधली ब्राम्ही लिपी ही थोडी वेगळी आहे आणि तिचं सौंदर्य अगदी दुरूनही नजरेत भरतं.  चित्र क्र १ . मांदाड येथील कुडा लेणी ( छायाचित्र सौजन्य: maharashtratourism.co.in) लेण्यांचे ठिकाण निवडताना दगडाची निवड,दगडाचा पोत, दगडाचे पाणी साठवण्याची क्षमता आणि तीव्र उन्हाळ्यात टाक्यांमध्ये पाणी आटल्यास आजूबाजूला बारमाही वाहणाऱ्या नदीची व्यवस...

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी ॥ श्री गणेशाय नमः ॥ भारतीय संस्कृती साठी वैदिक आणि पौराणिक हे महत्त्वाचे कालखंड आहेत . या कालखंडामधले काही देव, दैवत, यक्ष, गंधर्व, अप्सरा,दहा दिशांचे दिक्पाल हे जरी कालबाह्य झाले असले तरी मुर्त्यांचा स्वरूपातून ते आजही नजरेस पडतात . यातल्या बऱ्याचशा मुर्त्या त्यांच्या शैलीवरून ओळखता येतात पण बऱ्याचश्या किल्ल्याच्या मुख्य दारावर आढळणारी शरभ ह्या प्राण्याची शिल्पं आजही सर्वसामान्यांना गोंधळात टाकतात .  चित्र क्रमांक १ . जलदुर्ग अर्नाळा येथील प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प . चित्र क्रमांक एक मध्ये दिसणारा हत्तीच्या वरचा वाघ की सिंह असा बुचकळ्यात टाकणारा प्राणी म्हणजेच शरभ होय ! शरीर यष्टी वाघ सिंहाशी जरी मिळतीजुळती असली तरी तोंड मात्र अगदी वेगळं आहे . सर्वात महत्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे ह्या शरभांचं शिल्प गडांच्या दरवाजावर का असतं ? त्यासाठी थोडा पुराणांचा संदर्भ घेऊया . विष्णूनें नृसिंहरूप धारण करून हिरण्यकशिपूस मारले; पण खून चढल्यामुळे त्याची उग्रता कमी होईना; तेव्हां सर्व सृष्टि शंकरास शरण गेली; शंकराने दोन तोंडे...