॥ श्री गणेशाय नमः ॥ छत्रपती शिवाजी महराजांची जन्मभूमी म्हणून नावलौकिकास आलेलं जुन्नर हे तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. जुन्नरला सातवाहन काळापासूनचा इतिहास आहे जो इसवी सन पूर्व २५० म्हणजेच आज पासून सुमारे २२०० वर्ष मागे जातो. सातवाहनांच्या समकालीन क्षत्रप राज्यकर्त्यांची ही राजधानी होती. बावीसशे वर्षापूर्वी मोसमी वाऱ्यांचा शोध लागल्यावर भारतातून रोम , ग्रीस इ देशांशीपण व्यापार सुरु झाला. त्या काळी नाला सोपारा ( शूर्पारक ) , कल्याण ( कलिअणस ), भरूच ( भरुकच्छ ) , चौल इ. बंदरांमधून व्यापार चालत असे. या बंदरांमधून आणलेला माल नाणेघाटातून जुन्नर मार्गे पैठणला म्हणजेच सातवाहनांच्या राजधानीत पोहोचवला जाई. डोंगर फोडून आणि दगडांत बांधलेला नाणेघाट हा सर्वात प्राचीन व्यापारी मार्ग आहे. शिवनेरी , तुळजा आणि गणेश लेण्यांच्या डोंगरसमूहाच्या कुशीत वसलेलं जुन्नर ज्याच्या ताब्यात, व्यापारी मार्ग त्यांच्या ताब्यात हे सुस्पष्ट समीकरण होतं. त्यामुळे जुन्नर आणि नाणेघाटावर ताबा ठेवण्यासाठी क्षत्रप आणि सातवाहनांमध्ये नेहमी संघर्ष चालू असे. पण ह्या अश्या राजकीय परिस्थितीतही जुन्नर स्वतःची धार्मिक ओळख टिक...
कलासक्त , ब्राम्ही लिपी, शिलालेख, मूर्ती शास्त्र , लेणी , किल्ले , मंदिर , बारव - प्राचीन जलव्यवस्थापन अभ्यासक