॥ हर हर महादेव ॥ ऋषीचे कूळ आणि नदीचं मूळ कधी शोधू नये असं म्हणतात . पण भारतात नद्यांना मातृत्वाचं स्थान दिलं जातं आणि त्यांच्या उगमाशी संबंधीत मंदिरही उभारली जातात हे विशेष . असंच एक सुंदर मंदिर रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडीत आहे ज्याचं नाव आहे अमृतेश्वर महादेव मंदिर आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या देवळातून प्रवरा नदी उगम पावते असं जाणकार सांगतात . चित्र क्रमांक १ . अमृतेश्वर महादेव मंदिर , रतनवाडी, भंडारदरा . चित्र क्रमांक २ . जलमग्न शिवलिंग , अमृतेश्वर महादेव . चित्र क्रमांक दोन मध्ये शिवलिंग पाण्यात बुडालेलं दिसतं . सर्वसाधारण पणे चारेक महिने ते पाण्यातच असतं . ह्याच संदर्भाने प्रवरा नदी इथून उगम पावते असं म्हणतात . चित्र क्रमांक ३ . अमृतेश्वर मंदिराची बारव ( पॅनारोमा ) . बारव म्हणजे पायविहीरीच . पण त्यांच जलव्यवस्थापन आणि स्थापत्य अगदी शास्त्रशुद्ध . मंदिराचा कळस जसा आसमंतात निमुळता होत जातो तशीच बारवही जमिनीत खोल जाताना निमुळती होते म्हणून त्यांना उपडी मंदिरे ( inverted temples ) सुद्धा म्हटलं जातं . बारा महिने पूर्ण गावाला पाणी पुर...
कलासक्त , ब्राम्ही लिपी, शिलालेख, मूर्ती शास्त्र , लेणी , किल्ले , मंदिर , बारव - प्राचीन जलव्यवस्थापन अभ्यासक