॥ हर हर महादेव ॥ जांभा खडकातल्या लेण्यांचं अस्सल सौंदर्य पाहायचं असेल तर गोव्यात खांडेपार नावाचं गाव गाठावं. गोव्यातल्या ५१ संरक्षित स्मारकांपैकी एक म्हणजे फोंडा येथील खांडेपार नदीजवळील खांडेपार लेणी ! स्थापत्य शास्त्रातल्या नेहमीच्या ठोकताळ्यांना बगल देत वेगळ्याच पद्धतीने बनवलेल्या लेण्या पाहायला मिळतात. सर्वसाधारण लेण्यांच्या आजूबाजूला आणि वरती खडक पाहायला मिळतो ज्यामध्ये लेण्या कोरलेल्या असतात. पण खांडेपारच्या लेण्यांमधे चक्क दगडात कोरलेलं शिखर दिसतं (चित्र क्र १ पहा). सध्या ही शिखरं अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. ह्या लेण्या दगडात कोरलेल्या वाटत नाहीत. उलट दगड आणून मंदिर बांधाव अश्या पद्धतीने बांधल्या आहेत. पण नीट निरीक्षण केलं तर कोरीव काम की बांधकाम असा प्रश्न पडतो हे त्याचं सौंदर्य विशेष ! चित्र क्र १. खांडेपारची लेणी. चित्र क्र २. लेण्यांच्या आतली संरचना एकूण ४ लेण्यांचा समूह पाहायला मिळतो. त्यात तीन लेण्या एकमेकांना लागून आहेत. यातल्या प्रत्येक लेण्यांमध्ये २ खोल्या आहेत. जवळूनच खांडेपार नदी वाहते. सर्व लेण्या अगदी साध्या आहेत. जांभा खडकांचं सौंदर्यच त्या...
कलासक्त , ब्राम्ही लिपी, शिलालेख, मूर्ती शास्त्र , लेणी , किल्ले , मंदिर , बारव - प्राचीन जलव्यवस्थापन अभ्यासक