॥ ॐ केशवाय नमः ॥ प्रवेशद्वारातील गोपूर, गरुड मूर्ती, मकर तोरण , नरसिंह, दारातील द्वारपाल जय - विजय आणि मदन रतीचं शिल्प पाहून आपण मंदिरात प्रवेश करतो. ( जर तुम्ही भाग एक वाचला नसेल तर येथे क्लिक करा ). आणि समोर दिसणार भगवंताचं मोहक रूप चित्तवृत्ती बदलून टाकतं. चित्र क्रमांक एक मध्ये दिसणाऱ्या लाल रंगाच्या पडद्यामागे भगवंताच्या दोन वेगवेगळ्या मूर्ती दिसतात.एक आहे ती नऊ फुटाची काळ्या दगडामध्ये घडवलेली विष्णूची मूर्ती ,मूर्तिशास्त्रा प्रमाणे अचल मूर्ती ह्या प्रकारात मोडणारी. अचलमूर्ती म्हणजे सुप्रतिष्ठित केलेली आणि जिला गर्भगृहाच्या बाहेर कधीही काढलं जात नाही. त्यासोबतच भगवंताची एक धातूची चल मूर्ती असते जिच्यावरती नित्य अभिषेक आणि इतर उपचार केले जातात.त्याचसोबत रथोत्सवाच्या वेळी या चल मूर्तीलाच बाहेर काढून मिरवलं जातं.सदर मंदिरात गर्भगृहाचे छायाचित्र काढण्यास मनाई आहे. त्यामुळे भगवंताच्या चल आणि अचल दोन्ही छायाचित्रांचा इथे संक्षेप देतो . चित्र क्र १ मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील मकरतोरण , विष्णू लक्ष्मीचं शिल्प आणि द्वारपाल भगवंताच्या लोभस मूर्तीच्या दर्शनानंतर आपण ...
कलासक्त , ब्राम्ही लिपी, शिलालेख, मूर्ती शास्त्र , लेणी , किल्ले , मंदिर , बारव - प्राचीन जलव्यवस्थापन अभ्यासक