मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गजहा - शिवाची रौद्र आणि संहारक रूपातली मूर्ती.

॥ हर हर महादेव ॥ ब्रम्हा विष्णू आणि महेश यापैकी महेश म्हणजेच शंकर ही विनाशाची देवता मानली जाते. शिव हा काही नुसतेच तत्परतेने जाऊन दैत्यांचा तावडीतून आपल्या भक्तांना सोडवतो असे नाही, तर तो मृत्यूची देवता 'यम' व प्रेमाची देवता 'मदन' यांना सुद्धा वेळप्रसंगी निष्प्रभ करतो व त्यांच्यावर विजय मिळवतो. तसेच आचरणात काही आगळीक केली म्हणून तो ब्रह्मदेवालाही धडा शिकवतो. तसेच त्रासदायक ठरू लागल्यावर तो नरसिंहालाही क्षमा करत नाही. त्यामुळेच शिव हा संहारक तर आहेच पण तो भयावह सुद्धा आहे. गजहा  सर्वांत प्राचीन संहारक मूर्ती ही गजहामूर्ती असून ती इसवीच्या ६व्या शतकातील आहे. कूर्मपुराणामध्ये  विस्ताराने सांगितली आहे. लिंगपूजा व तपश्चर्या करणाऱ्या ब्राह्मणांना हत्तीच्या रूपात येऊन त्रास देणाऱ्या नीलासुर नावाच्या दैत्याचा शिवाने कसा नाश केला. याची ही कथा आहे. असे सांगितले जाते की ही घटना वाराणसी येथे घडली. होती. शिवाने या हत्तीरूपी दानवाचा वध केला आणि त्याचे चामडे स्वतः पांघरले व वाराणसी इथे कृत्तिकेश्वर नावाच्या शिवलिंगाची पूजा करणाऱ्या ब्राह्मणांना या दैत्याच्या त्रासातून मुक्त केले. याच ...