॥ श्री गणेशाय नमः ॥ माझा मराठाचि बोलु कौतुकें परि अमृतातेही पैजा जिंके ॥ अमृतातेही पैजा जिंके म्हणणारी मराठी भाषा गेल्या किती वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि तिच्यात इतकी रसाळता आहे, जेणेकरून ती आजही इतकी सुंदरपणे टिकून आहे याचा शोध घ्यावासा वाटला त्याकरता हा लेख प्रपंच ! सर्वप्रथम आपण हे जाणून घ्यायला हवं की एखादी भाषा जेव्हा आपण बोलतो त्या भाषेचा उगम हा नक्की कुठून झाला. तर याचा शोध घेण्यासाठी आपण जेव्हा फार मागे मागे मागे जाऊ त्यावेळेस असं जाणवतं की संस्कृत ही देवतांची बोलीभाषा होती आणि पृथ्वीवर राहणाऱ्या इतर लोकांना ज्यांना संस्कृत अगदी स्पष्ट उच्चारता आली नाही त्यांनी त्या भाषेला स्वतःच्या वेगळ्या अशा नैसर्गिकपणे सहज उच्चारता येईल अशा प्राकृत भाषेत स्वीकारलं. आता संस्कृत आणि प्राकृतात मुख्य फरक काय तर आपल्या घरातलं लहान मूल जेव्हा नव्याने भाषा शिकते तेव्हा ते त्याला निसर्गतः बोलता येणाऱ्याच अक्षरांचा उच्चार करतं आणि काही कठीण अक्षर ते इतर दुसऱ्या अक्षरांना वापरून उच्चारतं. उदाहरणार्थ राहुल मधला "रा" हे अक्षर लहान मुलांना उच्चारताना कठीण जातं आणि त्या बदल्यात ते त्य...
कलासक्त , ब्राम्ही लिपी, शिलालेख, मूर्ती शास्त्र , लेणी , किल्ले , मंदिर , बारव - प्राचीन जलव्यवस्थापन अभ्यासक