श्री गणेशाय नमः मूर्ती शास्त्राचा अभ्यास करताना मूर्ती वैविध्याचाही अभ्यास आपसूकच घडतो आणि ह्याची प्रचिती मला वेरूळ इथल्या हरिहरत्मक रुक्मिणी पांडुरंग मूर्ती या मूर्तीचा अभ्यास करताना आली. एखादी मूर्ती स्वतःमध्ये शंकर विष्णू आणि पांडुरंग या तिघांचं जर तेज धारण करत असेल तर त्याच्या सौंदर्याची कल्पना करा. आता सर्वप्रथम मूर्तीची माहिती आणि थोडासा इतिहास समजून घेऊया. ही मूर्ती वेरूळ इथल्या बारा ज्योतिर्लिंग पैकी घृष्णेश्वर मंदिराच्या एक किलोमीटरच्या अंतरावर टोपरे कुटुंबीयांच्या घराजवळ सुप्रतिष्ठित आहे. मूर्तीच्या दैनिक पूजेचे आणि सेवेचे सौभाग्य टोपरे कुटुंब गेली सातशे वर्ष सांभाळत आहेत. मी प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांनी माझं उत्तम स्वागत केलं आणि त्याचबरोबर संपूर्ण वेळ चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवत मूर्ति बद्दलच्या माझ्या प्रश्नांचं उत्तम निरसन केलं त्याबद्दल त्यांचे अनंत आभार ! ही मूर्ती तिथे कशी आली याबद्दलची कथा त्यांच्याकडूनच ऐकायला मिळाली ती खालील प्रमाणे : खूप पूर्वी सातशे वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याला जमीन नांगरताना जमिनीत काहीतरी अडलं आणि काय आहे हे बघायला गेला तर जमिनीतून रक्ताची धार...
कलासक्त , ब्राम्ही लिपी, शिलालेख, मूर्ती शास्त्र , लेणी , किल्ले , मंदिर , बारव - प्राचीन जलव्यवस्थापन अभ्यासक