मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

माझी मायबोली - मराठी किती प्राचीन ?

॥ श्री गणेशाय नमः ॥ माझा मराठाचि बोलु कौतुकें  परि अमृतातेही पैजा जिंके ॥  अमृतातेही पैजा जिंके म्हणणारी मराठी भाषा गेल्या किती वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि तिच्यात इतकी  रसाळता आहे, जेणेकरून ती आजही इतकी सुंदरपणे टिकून आहे याचा शोध घ्यावासा वाटला त्याकरता हा लेख प्रपंच ! सर्वप्रथम आपण हे जाणून घ्यायला हवं की एखादी भाषा जेव्हा आपण बोलतो त्या भाषेचा उगम हा नक्की कुठून झाला. तर याचा शोध घेण्यासाठी आपण जेव्हा फार मागे मागे मागे जाऊ त्यावेळेस असं जाणवतं की संस्कृत ही देवतांची बोलीभाषा होती आणि पृथ्वीवर राहणाऱ्या इतर लोकांना ज्यांना संस्कृत अगदी स्पष्ट उच्चारता आली नाही त्यांनी त्या भाषेला स्वतःच्या वेगळ्या अशा नैसर्गिकपणे सहज उच्चारता येईल अशा प्राकृत भाषेत स्वीकारलं. आता संस्कृत आणि प्राकृतात मुख्य फरक काय तर आपल्या घरातलं लहान मूल जेव्हा नव्याने भाषा शिकते तेव्हा ते त्याला निसर्गतः बोलता येणाऱ्याच अक्षरांचा उच्चार करतं आणि काही कठीण अक्षर ते इतर दुसऱ्या अक्षरांना वापरून उच्चारतं. उदाहरणार्थ राहुल मधला "रा" हे अक्षर लहान मुलांना उच्चारताना कठीण जातं आणि त्या बदल्यात ते त्य...

लज्जागौरी - स्त्रीच्या मातृत्वाचे पूजन !

॥ श्री गणेशाय नमः ॥ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही चतुसूत्री आपल्या शास्त्रात प्राचीन काळापासून सांगितली आहे. भारतातली आणि भारताबाहेरील काही निवडक मंदिरं पाहताना तुम्हाला ही चतुसूत्री आवर्जून पाहायला मिळेल. देवळांच्या बाह्य भिंती म्हणजेच मंडोवरावर धर्म, अर्थ आणि काम ह्या संदर्भात अनेक शिल्प आढळतात. धर्म सांगण्यासाठी रामायण महाभारत आणि पुराणातल्या इतर अनेक कथांचा वापर करून विविध शिल्प घडवलेली दिसतात. तर पूर्वीच्या काळात अर्थकारण कसं चालायचं याचा दृष्टांत म्हणून शेतीकाम, पशुपालन इत्यादी अनेक शिल्प बाह्य भिंतीवर आढळतात( जी लोकांनी हेतू पुरस्करपणे नेहमी दुर्लक्षित ठेवली). काम शिल्प ही केवळ खजूराहो मंदिरात आहेत असा अनेकांचा गैरसमज आहे मात्र ते तसे नसून काम शिल्प बऱ्याचशा मंदिरांच्या मंडोवरावर आढळतात. मुळातच, एखाद्या गोष्टीचा मूळ हेतू ज्ञात नसल्यास त्याबद्दल वावड्या उठणं अत्यंत स्वाभाविक ! धर्म, अर्थ, काम हे बाहेर बाह्य भिंतींवर कारण मोक्ष मिळण्याआधी हे सर्व करणे गरजेचे असे शास्त्रकारांनी सांगितले. आधी प्रपंच करावा नेटका ! हे सर्व जगून देवळाबाहेरच ठेवून देवळाच्या आत मोक्ष मिळावा म्हणून प्रवेश ...

गजहा - शिवाची रौद्र आणि संहारक रूपातली मूर्ती.

॥ हर हर महादेव ॥ ब्रम्हा विष्णू आणि महेश यापैकी महेश म्हणजेच शंकर ही विनाशाची देवता मानली जाते. शिव हा काही नुसतेच तत्परतेने जाऊन दैत्यांचा तावडीतून आपल्या भक्तांना सोडवतो असे नाही, तर तो मृत्यूची देवता 'यम' व प्रेमाची देवता 'मदन' यांना सुद्धा वेळप्रसंगी निष्प्रभ करतो व त्यांच्यावर विजय मिळवतो. तसेच आचरणात काही आगळीक केली म्हणून तो ब्रह्मदेवालाही धडा शिकवतो. तसेच त्रासदायक ठरू लागल्यावर तो नरसिंहालाही क्षमा करत नाही. त्यामुळेच शिव हा संहारक तर आहेच पण तो भयावह सुद्धा आहे. गजहा  सर्वांत प्राचीन संहारक मूर्ती ही गजहामूर्ती असून ती इसवीच्या ६व्या शतकातील आहे. कूर्मपुराणामध्ये  विस्ताराने सांगितली आहे. लिंगपूजा व तपश्चर्या करणाऱ्या ब्राह्मणांना हत्तीच्या रूपात येऊन त्रास देणाऱ्या नीलासुर नावाच्या दैत्याचा शिवाने कसा नाश केला. याची ही कथा आहे. असे सांगितले जाते की ही घटना वाराणसी येथे घडली. होती. शिवाने या हत्तीरूपी दानवाचा वध केला आणि त्याचे चामडे स्वतः पांघरले व वाराणसी इथे कृत्तिकेश्वर नावाच्या शिवलिंगाची पूजा करणाऱ्या ब्राह्मणांना या दैत्याच्या त्रासातून मुक्त केले. याच ...

चेन्नकेशवा मंदिर भाग २ मंदिराचे अंतरंग

॥ ॐ केशवाय नमः ॥ प्रवेशद्वारातील गोपूर, गरुड मूर्ती, मकर तोरण , नरसिंह, दारातील द्वारपाल जय - विजय आणि मदन रतीचं शिल्प पाहून आपण मंदिरात प्रवेश करतो. ( जर तुम्ही भाग एक वाचला नसेल तर येथे क्लिक करा ). आणि समोर दिसणार भगवंताचं मोहक रूप चित्तवृत्ती बदलून टाकतं. चित्र क्रमांक एक मध्ये दिसणाऱ्या लाल रंगाच्या पडद्यामागे भगवंताच्या दोन वेगवेगळ्या मूर्ती दिसतात.एक आहे ती नऊ फुटाची काळ्या दगडामध्ये घडवलेली विष्णूची मूर्ती ,मूर्तिशास्त्रा प्रमाणे अचल मूर्ती ह्या प्रकारात मोडणारी. अचलमूर्ती म्हणजे सुप्रतिष्ठित केलेली आणि जिला गर्भगृहाच्या बाहेर कधीही काढलं जात नाही. त्यासोबतच भगवंताची एक धातूची चल मूर्ती असते जिच्यावरती नित्य अभिषेक आणि इतर उपचार केले जातात.त्याचसोबत रथोत्सवाच्या वेळी या चल मूर्तीलाच बाहेर काढून मिरवलं जातं.सदर मंदिरात गर्भगृहाचे छायाचित्र काढण्यास मनाई आहे. त्यामुळे भगवंताच्या चल आणि अचल दोन्ही छायाचित्रांचा इथे संक्षेप देतो . चित्र क्र १ मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील मकरतोरण , विष्णू लक्ष्मीचं शिल्प आणि द्वारपाल भगवंताच्या लोभस मूर्तीच्या दर्शनानंतर आपण ...

चेन्नकेशवा मंदिर, बेलूर, कर्नाटक, भाग १

॥ ॐ केशवाय नमः ॥ चेन्न म्हणजे कानडी भाषेत सुंदर आणि केशवा म्हणजे विष्णू,  आणि सुंदर अश्या विष्णूचे मंदिर तेच चेन्नकेशवा मंदिर. कर्नाटक राज्यातल्या हासन जिल्ह्यात बेलूर या गावात हे भव्य दिव्य मंदिर आहे. भव्यतेची कल्पना मंदिर बांधायला १०३ वर्षे लागली यावरूनच घ्यावी. तेराव्या शतकात होयसळ  साम्राज्यात हे मंदिर बांधले गेलं. मंदिराचा आवार अतिप्रचंड असून आत मध्ये साक्षात श्री विष्णूंची पूजा घडत असल्यामुळे आध्यात्मिक स्पंदनं सक्रिय आहेत.  चित्र क्र १ मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार मंदिराचे मुख्य भाग १) गोपूर २) गरुड मूर्ती आणि गरुड ध्वज ३) मुख्य मंदिर ४) मुख्य मंदिराची लहान प्रतिकृती ५) झोपाळा - विशिष्ट दिवशी देवाला झोपाळ्यात बसवून झोके देतात , ६) कल्याण मंडप - गावातल्या लोकांसाठी लग्ना साठी सभागृह. ७) देवीचं देऊळ. ८) बारव - देवळासाठी पाण्याची व्यवस्था, लहान विहीर. ९) कृष्ण मंदिर. १०) मंदिराभोवतीचं दगडी कुंपण ( विविध नागदेवता आणि इतर देवतांची शिल्पं आणि सोबतच अनेक वीरगळ. ) आता मंदिराच्या वेगवेगळ्या भागांची महत्वाची माहिती घेऊया. चित्र क्र २ गोपूर मंदिरा समोरच अतिशय भव्य गोपूर दिमाखात...

त्रिंगलवाडी गावातील घोडेस्वार सतीशिळा

॥ हर हर महादेव ॥ वीरगळांचे अनेक प्रकार आढळतात. त्यातला सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे सतीशिळा. वीरगळ हा वीराच्या मृत्युचे कारण दर्शवतो तर सतीशिळा ही त्या वीराची पत्नी त्याच्या मृत्युनंतर  सती गेली हे दर्शवते. सतीशिळा ओळखावी कशी हे समजण्यासाठी वीरगळाचे नीर निरीक्षण करावे. त्याच वीरगळावर जर कुठेही कोपरापासून दुमडलेला हात दिसला ( चित्र क्र १ ) तर त्या वीरगळाला सतीशिळा म्हणतात. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या ( ईगतपूरी, नाशिक ) पायथ्याशी प्राचीन जैन लेणी आहेत. त्यांच्या जवळ आढळलेल्या सतीशिळेबद्दल. चित्र क्र १. सतीशिळेचं छायाचित्र. चित्र क्र. २. सतीशिळेचं संपादीत छायाचित्र.   चित्र क्र ३. सतीशिळेचा खालचा टप्पा   चित्र क्र. ४. सतीशिळेचा मधला कप्पा नेहमी प्रमाणे वीरगळ आणि सतीशिळा टप्प्या टप्याने समजून घेऊ. कप्पा क्र १ . सर्वात खालचा कप्पा . चित्र क्र ( ३ ) सर्वात खालच्या कप्प्यात सती जाणारी स्त्री घोड्यावर बसलेली दिसते . सोबत तिच्या सहचरणी आहेत . त्यांच्या डोक्यावर सतीचे वाण आहे.  कप्पा क्र. २ वीरगळाच्या  उजव्या बाजूला कोपरातून दुमडलेल...

सोलापूरजवळील सकाट गावातील वीर स्त्रीचा वीरगळ .

 ॥ हर हर महादेव ॥ चूल आणि मूल इतकीच चाकोरीबद्ध भूमिका स्रियांनी निभावली हे आपल्याला इतिहासकारांनी मनावर अगदी सहजपणे ठसवलं. पण भारतीय इतिहास केवळ पुस्तकांमधून नाही तर शिलालेख, बारव, मंदिरं आणि वीरगळ अशा अनेकोत्तम साधनांमधून वाचता येतो. आपल्याकडे लागते ती केवळ दृष्टी !  मागे सोलापूरच्या सहलीमध्ये सकाट गावात एक वीरगळ माझ्या दृष्टीस पडला. मारुतीच्या मंदिरात मारुतीच्या मूर्तीशेजारीच असे दोन वीरगळ पहायला मिळतात. ही गोष्ट मला सर्वत्र आढळली की वीरगळांचा संदर्भ काहीकदा लागत नसल्याने ते गावाच्या वेशीवर, देवळांमध्ये किंवा किल्ल्यांवर कुठेतरी कडेला लावून ठेवलेले दिसतात. चित्र क्र १ . वीरगळाचे छायाचित्र . चित्र क्र २. वीरगळाचे संपादित केलेलं छायाचित्र . वीरगळ म्हणजे एक शिल्पपटच असतो. आणि म्हणून त्याला टप्प्या टप्प्यानेच समजून घ्यावं लागतं. टप्पा क्र १. खालून पहिला कप्पा. नेहमीप्रमाणे वीरगळाचा खालचा कप्पा हा वीराच्या मृत्यूचं कारण दर्शवतो. इथे पुरुषांऐवजी दोन स्त्रिया ( पिवळा रंग ) हातात ढाल आणि तलवार घेऊन लढताना दिसतात. गुडघ्यापर्यंत आलेली वस्त्रं, केसांचा बांधलेला अंबाडा, काना...