मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

त्रिंगलवाडी गावातील घोडेस्वार सतीशिळा

॥ हर हर महादेव ॥ वीरगळांचे अनेक प्रकार आढळतात. त्यातला सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे सतीशिळा. वीरगळ हा वीराच्या मृत्युचे कारण दर्शवतो तर सतीशिळा ही त्या वीराची पत्नी त्याच्या मृत्युनंतर  सती गेली हे दर्शवते. सतीशिळा ओळखावी कशी हे समजण्यासाठी वीरगळाचे नीर निरीक्षण करावे. त्याच वीरगळावर जर कुठेही कोपरापासून दुमडलेला हात दिसला ( चित्र क्र १ ) तर त्या वीरगळाला सतीशिळा म्हणतात. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या ( ईगतपूरी, नाशिक ) पायथ्याशी प्राचीन जैन लेणी आहेत. त्यांच्या जवळ आढळलेल्या सतीशिळेबद्दल. चित्र क्र १. सतीशिळेचं छायाचित्र. चित्र क्र. २. सतीशिळेचं संपादीत छायाचित्र.   चित्र क्र ३. सतीशिळेचा खालचा टप्पा   चित्र क्र. ४. सतीशिळेचा मधला कप्पा नेहमी प्रमाणे वीरगळ आणि सतीशिळा टप्प्या टप्याने समजून घेऊ. कप्पा क्र १ . सर्वात खालचा कप्पा . चित्र क्र ( ३ ) सर्वात खालच्या कप्प्यात सती जाणारी स्त्री घोड्यावर बसलेली दिसते . सोबत तिच्या सहचरणी आहेत . त्यांच्या डोक्यावर सतीचे वाण आहे.  कप्पा क्र. २ वीरगळाच्या  उजव्या बाजूला कोपरातून दुमडलेल...

सोलापूरजवळील सकाट गावातील वीर स्त्रीचा वीरगळ .

 ॥ हर हर महादेव ॥ चूल आणि मूल इतकीच चाकोरीबद्ध भूमिका स्रियांनी निभावली हे आपल्याला इतिहासकारांनी मनावर अगदी सहजपणे ठसवलं. पण भारतीय इतिहास केवळ पुस्तकांमधून नाही तर शिलालेख, बारव, मंदिरं आणि वीरगळ अशा अनेकोत्तम साधनांमधून वाचता येतो. आपल्याकडे लागते ती केवळ दृष्टी !  मागे सोलापूरच्या सहलीमध्ये सकाट गावात एक वीरगळ माझ्या दृष्टीस पडला. मारुतीच्या मंदिरात मारुतीच्या मूर्तीशेजारीच असे दोन वीरगळ पहायला मिळतात. ही गोष्ट मला सर्वत्र आढळली की वीरगळांचा संदर्भ काहीकदा लागत नसल्याने ते गावाच्या वेशीवर, देवळांमध्ये किंवा किल्ल्यांवर कुठेतरी कडेला लावून ठेवलेले दिसतात. चित्र क्र १ . वीरगळाचे छायाचित्र . चित्र क्र २. वीरगळाचे संपादित केलेलं छायाचित्र . वीरगळ म्हणजे एक शिल्पपटच असतो. आणि म्हणून त्याला टप्प्या टप्प्यानेच समजून घ्यावं लागतं. टप्पा क्र १. खालून पहिला कप्पा. नेहमीप्रमाणे वीरगळाचा खालचा कप्पा हा वीराच्या मृत्यूचं कारण दर्शवतो. इथे पुरुषांऐवजी दोन स्त्रिया ( पिवळा रंग ) हातात ढाल आणि तलवार घेऊन लढताना दिसतात. गुडघ्यापर्यंत आलेली वस्त्रं, केसांचा बांधलेला अंबाडा, काना...

शिलालेखांचं नंदनवन - समुद्राकाठची कुडा लेणी, मुरुड !

॥ श्री गणेशाय नमः ॥ एखाद्या लेण्यामध्ये शांतचित्ताने डोळे मिटून ध्यान करावं आणि डोळे उघडल्यावर साक्षात समुद्र देवाचे दर्शन व्हावं असा अनुभव देणारं एकमेव लेणं हे कोकणात मुरुड मध्ये मांदाड गावाजवळ कोरलेलं आहे. नेहमीप्रमाणे एखाद दुसरे लेणं नसून इथेही २६ लेण्यांचा समूह दिसतो. कोकणाची ओळख असलेल्या जांभा खडकांमध्ये ही लेणी नाहीत हेही त्याचं एक वैशिष्ट्य ! लेणी बेसॉल्ट खडकात कोरलेली असून त्यात बुद्ध, समुद्री घोडा आणि दान देणाऱ्या युगुलाचं शिल्प इत्यादी अनेक शिल्प आढळतात. सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे प्रत्येक लेण्यांच्या दारावर आढळणारे शिलालेख आणि त्यांना कोरताना कोरक्याने वापरलेली प्रतिभा संपन्न वळणं. जुन्नर, नाशिक इत्यादी ठिकाणी आढळणाऱ्या शिलालेखांपेक्षा या शिलालेखांमधली ब्राम्ही लिपी ही थोडी वेगळी आहे आणि तिचं सौंदर्य अगदी दुरूनही नजरेत भरतं.  चित्र क्र १ . मांदाड येथील कुडा लेणी ( छायाचित्र सौजन्य: maharashtratourism.co.in) लेण्यांचे ठिकाण निवडताना दगडाची निवड,दगडाचा पोत, दगडाचे पाणी साठवण्याची क्षमता आणि तीव्र उन्हाळ्यात टाक्यांमध्ये पाणी आटल्यास आजूबाजूला बारमाही वाहणाऱ्या नदीची व्यवस...