मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

चेन्नकेशवा मंदिर भाग २ मंदिराचे अंतरंग

॥ ॐ केशवाय नमः ॥ प्रवेशद्वारातील गोपूर, गरुड मूर्ती, मकर तोरण , नरसिंह, दारातील द्वारपाल जय - विजय आणि मदन रतीचं शिल्प पाहून आपण मंदिरात प्रवेश करतो. ( जर तुम्ही भाग एक वाचला नसेल तर येथे क्लिक करा ). आणि समोर दिसणार भगवंताचं मोहक रूप चित्तवृत्ती बदलून टाकतं. चित्र क्रमांक एक मध्ये दिसणाऱ्या लाल रंगाच्या पडद्यामागे भगवंताच्या दोन वेगवेगळ्या मूर्ती दिसतात.एक आहे ती नऊ फुटाची काळ्या दगडामध्ये घडवलेली विष्णूची मूर्ती ,मूर्तिशास्त्रा प्रमाणे अचल मूर्ती ह्या प्रकारात मोडणारी. अचलमूर्ती म्हणजे सुप्रतिष्ठित केलेली आणि जिला गर्भगृहाच्या बाहेर कधीही काढलं जात नाही. त्यासोबतच भगवंताची एक धातूची चल मूर्ती असते जिच्यावरती नित्य अभिषेक आणि इतर उपचार केले जातात.त्याचसोबत रथोत्सवाच्या वेळी या चल मूर्तीलाच बाहेर काढून मिरवलं जातं.सदर मंदिरात गर्भगृहाचे छायाचित्र काढण्यास मनाई आहे. त्यामुळे भगवंताच्या चल आणि अचल दोन्ही छायाचित्रांचा इथे संक्षेप देतो . चित्र क्र १ मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील मकरतोरण , विष्णू लक्ष्मीचं शिल्प आणि द्वारपाल भगवंताच्या लोभस मूर्तीच्या दर्शनानंतर आपण ...

चेन्नकेशवा मंदिर, बेलूर, कर्नाटक, भाग १

॥ ॐ केशवाय नमः ॥ चेन्न म्हणजे कानडी भाषेत सुंदर आणि केशवा म्हणजे विष्णू,  आणि सुंदर अश्या विष्णूचे मंदिर तेच चेन्नकेशवा मंदिर. कर्नाटक राज्यातल्या हासन जिल्ह्यात बेलूर या गावात हे भव्य दिव्य मंदिर आहे. भव्यतेची कल्पना मंदिर बांधायला १०३ वर्षे लागली यावरूनच घ्यावी. तेराव्या शतकात होयसळ  साम्राज्यात हे मंदिर बांधले गेलं. मंदिराचा आवार अतिप्रचंड असून आत मध्ये साक्षात श्री विष्णूंची पूजा घडत असल्यामुळे आध्यात्मिक स्पंदनं सक्रिय आहेत.  चित्र क्र १ मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार मंदिराचे मुख्य भाग १) गोपूर २) गरुड मूर्ती आणि गरुड ध्वज ३) मुख्य मंदिर ४) मुख्य मंदिराची लहान प्रतिकृती ५) झोपाळा - विशिष्ट दिवशी देवाला झोपाळ्यात बसवून झोके देतात , ६) कल्याण मंडप - गावातल्या लोकांसाठी लग्ना साठी सभागृह. ७) देवीचं देऊळ. ८) बारव - देवळासाठी पाण्याची व्यवस्था, लहान विहीर. ९) कृष्ण मंदिर. १०) मंदिराभोवतीचं दगडी कुंपण ( विविध नागदेवता आणि इतर देवतांची शिल्पं आणि सोबतच अनेक वीरगळ. ) आता मंदिराच्या वेगवेगळ्या भागांची महत्वाची माहिती घेऊया. चित्र क्र २ गोपूर मंदिरा समोरच अतिशय भव्य गोपूर दिमाखात...

त्रिंगलवाडी गावातील घोडेस्वार सतीशिळा

॥ हर हर महादेव ॥ वीरगळांचे अनेक प्रकार आढळतात. त्यातला सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे सतीशिळा. वीरगळ हा वीराच्या मृत्युचे कारण दर्शवतो तर सतीशिळा ही त्या वीराची पत्नी त्याच्या मृत्युनंतर  सती गेली हे दर्शवते. सतीशिळा ओळखावी कशी हे समजण्यासाठी वीरगळाचे नीर निरीक्षण करावे. त्याच वीरगळावर जर कुठेही कोपरापासून दुमडलेला हात दिसला ( चित्र क्र १ ) तर त्या वीरगळाला सतीशिळा म्हणतात. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या ( ईगतपूरी, नाशिक ) पायथ्याशी प्राचीन जैन लेणी आहेत. त्यांच्या जवळ आढळलेल्या सतीशिळेबद्दल. चित्र क्र १. सतीशिळेचं छायाचित्र. चित्र क्र. २. सतीशिळेचं संपादीत छायाचित्र.   चित्र क्र ३. सतीशिळेचा खालचा टप्पा   चित्र क्र. ४. सतीशिळेचा मधला कप्पा नेहमी प्रमाणे वीरगळ आणि सतीशिळा टप्प्या टप्याने समजून घेऊ. कप्पा क्र १ . सर्वात खालचा कप्पा . चित्र क्र ( ३ ) सर्वात खालच्या कप्प्यात सती जाणारी स्त्री घोड्यावर बसलेली दिसते . सोबत तिच्या सहचरणी आहेत . त्यांच्या डोक्यावर सतीचे वाण आहे.  कप्पा क्र. २ वीरगळाच्या  उजव्या बाजूला कोपरातून दुमडलेल...

सोलापूरजवळील सकाट गावातील वीर स्त्रीचा वीरगळ .

 ॥ हर हर महादेव ॥ चूल आणि मूल इतकीच चाकोरीबद्ध भूमिका स्रियांनी निभावली हे आपल्याला इतिहासकारांनी मनावर अगदी सहजपणे ठसवलं. पण भारतीय इतिहास केवळ पुस्तकांमधून नाही तर शिलालेख, बारव, मंदिरं आणि वीरगळ अशा अनेकोत्तम साधनांमधून वाचता येतो. आपल्याकडे लागते ती केवळ दृष्टी !  मागे सोलापूरच्या सहलीमध्ये सकाट गावात एक वीरगळ माझ्या दृष्टीस पडला. मारुतीच्या मंदिरात मारुतीच्या मूर्तीशेजारीच असे दोन वीरगळ पहायला मिळतात. ही गोष्ट मला सर्वत्र आढळली की वीरगळांचा संदर्भ काहीकदा लागत नसल्याने ते गावाच्या वेशीवर, देवळांमध्ये किंवा किल्ल्यांवर कुठेतरी कडेला लावून ठेवलेले दिसतात. चित्र क्र १ . वीरगळाचे छायाचित्र . चित्र क्र २. वीरगळाचे संपादित केलेलं छायाचित्र . वीरगळ म्हणजे एक शिल्पपटच असतो. आणि म्हणून त्याला टप्प्या टप्प्यानेच समजून घ्यावं लागतं. टप्पा क्र १. खालून पहिला कप्पा. नेहमीप्रमाणे वीरगळाचा खालचा कप्पा हा वीराच्या मृत्यूचं कारण दर्शवतो. इथे पुरुषांऐवजी दोन स्त्रिया ( पिवळा रंग ) हातात ढाल आणि तलवार घेऊन लढताना दिसतात. गुडघ्यापर्यंत आलेली वस्त्रं, केसांचा बांधलेला अंबाडा, काना...

शिलालेखांचं नंदनवन - समुद्राकाठची कुडा लेणी, मुरुड !

॥ श्री गणेशाय नमः ॥ एखाद्या लेण्यामध्ये शांतचित्ताने डोळे मिटून ध्यान करावं आणि डोळे उघडल्यावर साक्षात समुद्र देवाचे दर्शन व्हावं असा अनुभव देणारं एकमेव लेणं हे कोकणात मुरुड मध्ये मांदाड गावाजवळ कोरलेलं आहे. नेहमीप्रमाणे एखाद दुसरे लेणं नसून इथेही २६ लेण्यांचा समूह दिसतो. कोकणाची ओळख असलेल्या जांभा खडकांमध्ये ही लेणी नाहीत हेही त्याचं एक वैशिष्ट्य ! लेणी बेसॉल्ट खडकात कोरलेली असून त्यात बुद्ध, समुद्री घोडा आणि दान देणाऱ्या युगुलाचं शिल्प इत्यादी अनेक शिल्प आढळतात. सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे प्रत्येक लेण्यांच्या दारावर आढळणारे शिलालेख आणि त्यांना कोरताना कोरक्याने वापरलेली प्रतिभा संपन्न वळणं. जुन्नर, नाशिक इत्यादी ठिकाणी आढळणाऱ्या शिलालेखांपेक्षा या शिलालेखांमधली ब्राम्ही लिपी ही थोडी वेगळी आहे आणि तिचं सौंदर्य अगदी दुरूनही नजरेत भरतं.  चित्र क्र १ . मांदाड येथील कुडा लेणी ( छायाचित्र सौजन्य: maharashtratourism.co.in) लेण्यांचे ठिकाण निवडताना दगडाची निवड,दगडाचा पोत, दगडाचे पाणी साठवण्याची क्षमता आणि तीव्र उन्हाळ्यात टाक्यांमध्ये पाणी आटल्यास आजूबाजूला बारमाही वाहणाऱ्या नदीची व्यवस...

खांडेपार लेणी - गोव्यातील जांभा खडकातील लेणी !

॥ हर हर महादेव ॥ जांभा खडकातल्या लेण्यांचं अस्सल सौंदर्य पाहायचं असेल तर गोव्यात खांडेपार नावाचं गाव गाठावं. गोव्यातल्या ५१ संरक्षित स्मारकांपैकी एक म्हणजे फोंडा येथील खांडेपार नदीजवळील खांडेपार लेणी ! स्थापत्य शास्त्रातल्या नेहमीच्या ठोकताळ्यांना बगल देत वेगळ्याच पद्धतीने बनवलेल्या लेण्या पाहायला मिळतात. सर्वसाधारण लेण्यांच्या आजूबाजूला आणि वरती खडक पाहायला मिळतो ज्यामध्ये लेण्या कोरलेल्या असतात. पण खांडेपारच्या लेण्यांमधे चक्क दगडात कोरलेलं शिखर दिसतं (चित्र क्र १ पहा). सध्या ही शिखरं अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. ह्या लेण्या दगडात कोरलेल्या वाटत नाहीत. उलट दगड आणून मंदिर बांधाव अश्या पद्धतीने बांधल्या आहेत. पण नीट निरीक्षण केलं तर कोरीव काम की बांधकाम असा प्रश्न पडतो हे त्याचं सौंदर्य विशेष !   चित्र क्र १. खांडेपारची लेणी. चित्र क्र २. लेण्यांच्या आतली संरचना एकूण ४ लेण्यांचा समूह पाहायला मिळतो. त्यात तीन लेण्या एकमेकांना लागून आहेत. यातल्या प्रत्येक लेण्यांमध्ये २ खोल्या आहेत. जवळूनच खांडेपार नदी वाहते. सर्व लेण्या अगदी साध्या आहेत. जांभा खडकांचं सौंदर्यच त्या...

गोव्यामधली जांभा खडकातली हिंदू लेणी - हरवाळे लेणी !

॥ श्री गणेशाय नमः ॥ अप म्हणजे पश्चिम आणि ज्या भूमीचा अंत पश्चिमेला होतो ती भूमी म्हणजे अपरांत म्हणजेच आजचं कोकण ! परशुरामाने स्वतःच्या सामर्थ्याने ढकलून तयार केलेली ही भूमी भौगोलिक दृष्ट्या ही भारताच्या इतर भागांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात सर्वात जास्त नजरेत भरणारा फरक आहे तो कोकणात सापडणार्‍या खडकाचा !कोकणात सापडणारा लालसर आणि ठिसूळ दगड हा जांबा खडक म्हणून ओळखला जातो. बेसॉल्ट खडकाशी तुलना केल्यास जांबा खडका लेणी खोदण्यासाठी किंवा मूर्ती घडवण्यासाठी फारसा उपयुक्त नाही. तरीपण गोव्यातल्या हरवाळे येथील लेणी लहानशी असली तरी खूप आकर्षक आहेत. चित्र क्र १ . हरवाळे येथील धबधबा कोणत्याही ठिकाणी लेणी घडवताना तिथे राहणाऱ्या लोकांना बारा महिने पाण्याची सोय व्हावी हे लक्षात घेऊनच लेणी घडवली जात. हरवाळे इथला धबधबा गोव्यामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. हरवाळे येथील लेणी ह्या धबधब्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. धबधब्यातून होणारा पाण्याचा विसर्ग हा लेण्यांसमोरूनच खळखळ करत वाहत जातो आणि लेण्यात बसलेल्यांना आत्म शांततेचा अनुभव देतो. चित्र क्र १ नीटपणे पाहिल्यास दगडाच्या प्रस्तराचा फरक कळून...